कवितासंग्रहाचे प्रकाशन झाल्याबद्दल प्रा. गणेश कांबळे यांचा सत्कार

उस्मानाबाद : लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल सलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. गणेश महादेव कांबळे मुरमकर यांच्या क्रांतीसम्रट ज्ञानियाचा राजा, गुरु रविदास माझा या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाल्याबद्दल आज बुधवारी 14 डिसेंबर रोजी प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील यांच्या हस्ते प्रा. गणेश कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शाळा व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.