लोहारा (प्रतिनिधी) जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी वैभव होंडराव उपाध्यक्षपदी गौरीशंकर जट्टे आणि समर्थ धनराज कुंभार,सचिवपदी विरभद्र फावडे, शिवप्रसाद होंडराव,सहसचिवपदी महेश कुंभार आणि बाळू माशाळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
लोहारा शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात येते.यंदा २०२५ साली विविध सामाजिक उपक्रमांनी महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्याचे आयोजन बैठकीत करण्यात आले.
जयंतीनिमित्त लोहारा येथील महात्मा बसवेश्वर मंदिरात नागण्णा वकील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
बैठकीला मा.सरपंच शंकर अण्णा जट्टे,शिवसेना(उबाठा) तालुकाप्रमुख अमोल बिराजदार,नगरसेवक जालिंदर कोकणे,जि.प.शालेय समिती अध्यक्ष हरी लोखंडे,सामाजिक कार्यकर्ते केडी पाटील,मल्लिनाथ घोंगडे,शिवानंद स्वामी,वैजीनाथ जट्टे,बापु जट्टे,सोमनाथ जट्टे,मल्लिनाथ बनशेट्टी आदींच्या उपस्थितीत पुढील प्रमाणे कार्यकारणीची निवड करण्यात आली.
मिरवणूक प्रमुखपदी शशांक जट्टे,संदीप पाटील,प्रसिद्धी प्रमुखपदी गणेश कोप्पा, शिवानंद स्वामी,सुरज चपळे, कोषाध्यक्षपदी अंकुश नारायणकर,महेश बसवराज पाटील आदींच्या निवडी करण्यात आल्या.
दि.३० एप्रिल रोजी सकाळी महात्मा बसवेश्वर मंदिरात ध्वज पुजन त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौ क येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पुजन दि.२ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शिवनगर मिरवणूक कार्यक्रम आयोजित केले आहे.
बैठकिला संतोष फावडे, गणेश पालके, राजु कोराळे,गणेश कमलापुरे,विकास स्वामी, सचिन स्वामी,केदार जट्टे,अमोल तोडकरी,गणेश तोडकरी,प्रसाद मिटकरी, सुमित फावडे, यांच्यासह नागरिक समाज बांधव उपस्थित होते.