लोहारा, : ७ एप्रिल २०२५ – आज जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय, लोहारा येथे डायलिसीस युनिटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित पार पडले.
या उद्घाटन समारंभास मा. नगराध्यक्षा सौ. वैशालीताई अभिमान खराडे, मा. उपनगराध्यक्ष अमीन सुबेंकर, सर्व नगरसेवक, मा. जालिंदर कोकणे, मा. विजयकुमार ढगे, मा. आयुब शेख, मा. सौ. अरती ओम कोरे, मा. अमोल बिराजदार, मा. प्रमोद बंगले, रुग्णकल्याण समिती सदस्य डॉ. बाळासाहेब भुजबळ, मा. सलीम शेख, पत्रकार श्री. बालाजी बिराजदार, प्राचार्य शहाजी जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन आज दुपारी ४ वाजता पार पडले. यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार करून डायलिसीस युनिटचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर दुपारी १ वाजता मा. आमदार श्री. प्रविनजी स्वामी (उमरगा-लोहारा) आणि मा. दीपक भैया जवळगे यांनी रुग्णालयास भेट देवून नव्याने स्थापन करण्यात आलेल्या डायलिसीस युनिटची पाहणी केली आणि आपल्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र पापडे यांनी “आरोग्यदायी सुरुवात, आशादायी भविष्य” या ब्रीद वाक्याचे विश्लेषण करत रुग्णालयातील सुविधा व नव्याने सुरू झालेल्या डायलिसीस युनिटबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी ऑनलाईन माध्यमातून मा. मंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटनाचे प्रक्षेपणही करण्यात आले.
कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. गोविंद साठे, डॉ. खमीतकर मॅडम, डॉ. सुनील मंडले, HLL क्लस्टर हेड श्री. सुनील व्हनमाने, जिल्हा समन्वयक (डायलिसीस विभाग) इलाई शेख तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन डॉ. दस्तगिर मुजावर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. अंगद गिराम यांनी केले.
हा उपक्रम ग्रामीण भागातील रुग्णांसाठी एक मोठे पाऊल असून, आरोग्य सेवांमध्ये लोहारा ग्रामीण रुग्णालयाने आणखी एक मोलाची भर घातली आहे.