अचलेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाच्या तालुकाध्यक्षाच्या पत्नीची वर्णी

लोहारा : लोहारा तालुक्यातील अचलेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाच्या तालुकाध्यक्षाच्या पत्नीची वर्णी लागली आहे. निवड होताच नुतन सरपंच,उपसरपंच,सदस्याचा सत्कार करण्यात आला.
अचलेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच निवडीसंदर्भात नुतन सरपंच सौ. कांताबाई सुभाष सोलंकर यांच्या अध्यक्षतेखाली नुतन सदस्याची शुक्रवारी बैठक बोलविण्यात आली होती. उपसरपंचपदासाठी भाजपाचे लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या पत्नी सौ.प्रणाली राजेंद्र पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने अध्यासी अधिकारी राजेंद्र माळी यांनी सौ. प्रणाली पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यानंतर सरपंच सौ. कांताबाई सोलंकर,उपसरपंच सौ. प्रणाली पाटील, नुतन सदस्य सिध्दु गोपने, लखन चव्हाण,कुसुम पुजारी, उमादेवी बायस,गंगुबाई कलबुटगे, अमोल पुजारी, यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी अशोक पाटील,सुभाष सोलंकर,भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, गुरुसिंग बायस, दस्तगीर पटेल, बालासिंग बायस,सुरेश खंडाळकर, सुनिल पुजारी,अनिल कासार, राहुल माने,विष्णु लोहार,गोविंद चव्हाण, ज्ञानेश्वर उपासे,अमोल मदने,अशोक माळगे,प्रदिप पुजारी,शिवराज माळगे, सुदेंद्र परळकर, आप्पास कांबळे, मल्लीनाथ कदारे, मल्लीनाथ पाटील, अमिर शेख,हरीबा पुजारी, रमेश पुजारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!