लोहारा / उमरगा : आज शनिवार दि. 01/02/2025 रोजी शिवसेना उपनेते तथा मा. आ. श्री. ज्ञानराज चौगुले यांची भेट घेऊन वडगांव (गां) ता. लोहारा साठवण तलावाचे काम लवकरात लवकर चालू करावे असे निवेदन देण्यात आले. यासंदर्भात पालकमंत्री मा. श्री. प्रताप सरनाईक आणि जिल्हाधिकारी मा. श्री. सचिन ओंबासे साहेब यांच्या मार्फत योग्य ती कार्यवाही करून तात्काळ काम चालू करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
त्याचसोबत संबंधित अधिकारी कापसे सर, जिल्हा जलसंधारण अधिकारी महामुनी सर आणि कंत्राटदार पतंगे सर यांच्याशी त्यांनी फोनवरून चर्चा ही केली. कोणतेही काम असुद्या ते मार्गी लावण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन ही त्यांनी याप्रसंगी दिले.
प्रसंगी जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, उमरगा तालुकाप्रमुख बळी मामा सुरवसे, स्वीय सहाय्यक प्रदिप इंगळे-पाटील, उपसरपंच (वडगांववाडी) अंकुश भुजबळ, महादेव कार्ले, मधुकर गिराम, निकेश बचाटे उपस्थित होते.