३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर होळी (तांडा) येथे तब्बल एक लाख ६३ हजार ६८० रूपयांची गोवा बनावटीची दारू जप्त

उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील होळी (तांडा) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा मारत तब्बल एक लाख ६३ हजार ६८० रूपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली असून आरोपी उत्तम राठोड याला अटक करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवैद्य दारू विक्रीला चाप बसविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक सक्रिय झाले आहे. त्या अनुषंगाने लोहारा तालुक्यातील होळी येथे उमरगा येथील उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. होळी येथील उत्तम माणिक राठोड (वय ५२) हा आपल्या राहते घरात गोवा निर्मित व गोवा राज्यात विक्रीस असलेले दारुचे २२ बॉक्स (१०५६ बाटल्या ) सह एकूण १ लाख ६३ हजार ६८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणू आरोपी राठोड यास अटक करुन त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरच्या कारवाई उत्पादन शुल्क तुळजापूरचे निरीक्षक एस. जी. भवड, तानाजी कदम, प्रदीप गोणारकर, रघुनाथ कडवे, दुय्यम निरीक्षक चरणसिंग कुंठे, प्रभाकर कदम, सुमित चव्हाण, कर्मचारी राजेंद्रसिंह ठाकूर, विनोद हजारे, झुंबर काळे, अभिजीत भोंगाणे, अविनाश गवंडी, सुरेश वाघमोडे, बालाजी भंडारी, महेश कंकाळ,राजेश गिरी, तुषार नेर्लेकर, कोंडबा देशमुखे यांचा समावेश यांनी केली. पुढील तपास उमरगा येथील दुय्यम निरीक्षक एस. बी. सिद करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!