राजकीयधाराशिव

“जनतेच्या मनातील उमेदवार” — जेवळी जिल्हा परिषद गटात सौ. प्रणाली राजेंद्र पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा

लोहारा (जि. धाराशिव):
लोहारा तालुक्यातील जेवळी जिल्हा परिषद गटात सध्या एकच नाव सर्वत्र चर्चेत आहे — सौ. प्रणाली राजेंद्र पाटील. “समाजकारण म्हणजे लोकसेवा” हा विचार कृतीत उतरवणारे त्यांच्या पती, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या जनसंपर्क आणि कार्यशैलीचा ठसा आजही लोकांच्या मनावर आहे. त्यामुळेच परिसरात प्रणाली पाटील या जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून ओळखल्या जात आहेत.

कुटुंबातील संस्कार आणि समाजसेवेचे बाळकडू त्यांना त्यांच्या सासरे स्वातंत्र्यसैनिक अमृतराव पाटील यांच्याकडून लाभले आहे. अचलेर गावच्या उपसरपंच म्हणून त्यांनी प्रामाणिकपणे काम पाहिले, तर राजेंद्र पाटील यांनी सहकार क्षेत्रात लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक, बाजार समितीचे तज्ञ संचालक, तसेच ग्रामपंचायत सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात राजेंद्र पाटील यांनी जाती-धर्माच्या भिंती पुसून “एकता आणि विकास” या विचाराने कार्य केले. कोरोना काळातील त्यांचे रक्तदान शिबिरे, अन्नधान्य वाटप, आणि आरोग्य उपक्रम आजही लोकांच्या मनात आहेत. परिसरातील नागरिक त्यांना संवेदनशील, प्रामाणिक आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखतात.

आज जेवळी गटातील नागरिकांमध्ये एकच चर्चा आहे —
“आपल्या भागाला अखेर हक्काचा जिल्हा परिषद सदस्य मिळणार!”

राजेंद्र पाटील यांच्या कार्यशैलीवर आणि सेवाभावी वृत्तीवर विश्वास ठेवत नागरिक मोठ्या उत्साहाने सौ. प्रणाली राजेंद्र पाटील यांच्या उमेदवारीची अपेक्षा व्यक्त करत आहेत.

सौ. प्रणाली राजेंद्र पाटील या केवळ दावेदार नाहीत, तर जनतेच्या मनातील उमेदवार आहेत — कर्तृत्व, समाजसेवा आणि नेतृत्वाचा संगम असलेल्या हक्काच्या जिल्हा परिषद सदस्यपदासाठी योग्य चेहरा!


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!