शैक्षणिक

वडगाव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मौलाली शेख, उपाध्यक्षपदी श्रद्धा पाटील

लोहारा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील वडगाव (गां) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मौलाली शेख यांची, तर उपाध्यक्षपदी श्रद्धा मल्लिनाथ पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

 

HTML img Tag Simply Easy Learning

मुख्याध्यापक शिवाजी फुलसुंदर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत शालेय व्यवस्थापन समितीच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी मौलाली शेख व उपाध्यक्षपदी श्रद्धा पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

समितीच्या सदस्यपदी आदम सय्यद, ओमप्रकाश फुलसुंदर, ज्ञानेश्वर पवार, अर्चना पवार, मनीषा गुरव, प्रिया नागेश फुलसुंदर आणि सोनाली धनाजी मिसाळ यांची निवड करण्यात आली.

यावेळीमुख्याध्यापक ,शिवाजी फुलसुंदर, रामहरी दणाने,अयाज सय्यद, लहू गायकवाड, किरण फुलसुंदर, किरण फुलसुंदर, नागेश फुलसुंदर, राहुल गावकवाड, ज्ञानेश्वर भुजबळ, बाबा माळी, मल्लिनाथ पाटील, बाबू सय्यद, हरी साबळुंबे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे ग्रामस्थ, पालक व शिक्षणप्रेमींकडून अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!