कृषीधाराशिवमहाराष्ट्र

१४ महसूल मंडळांना पीक विमा योजनेत समाविष्ट करा; अन्यथा ‘भीक मागो’ आंदोलनाचा इशारा

लोहारा ( जि. धाराशिव ) | प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून वगळण्यात आलेल्या १४ महसूल मंडळांचा तातडीने समावेश करण्यात यावा, अन्यथा शुक्रवारी (ता. १७) लोहारा शहरात ‘भीक मागो’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटना धाराशिवचे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद राठोड यांनी प्रशासनाला दिला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

यासंदर्भात जिल्हाधिकारी धाराशिव यांच्यामार्फत तहसीलदार, लोहारा यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, पावसाचा खंड, उशिरा झालेली पेरणी, वाढलेला शेती खर्च, नैसर्गिक संकटे आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी मोठा आधार असताना १४ महसूल मंडळे योजनेतून वगळण्याचा निर्णय हजारो शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रहार संघटनेने प्रशासनाकडे वगळलेल्या महसूल मंडळांची संयुक्त पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठवावा तसेच सर्व १४ महसूल मंडळांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तातडीने समावेश करावा, अशी मागणी केली आहे.
मागण्या मान्य न झाल्यास शुक्रवारी लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत ‘भीक मागो’ आंदोलन काढण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही प्रहार संघटनेने दिला आहे.
प्रहार संघटना धाराशिवचे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद राठोड यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!