धाराशिवमहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलैपासून ‘महाराजस्व समाधान शिबिर’; उमरगा येथे विधानसभा स्तरावरील शिबिर

तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून

लोहारा ( प्रतिनिधी ) . महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस व माजी उपमुख्यमंत्री दिवंगत मा.श्री अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिनांक 22 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत एक दिवसीय महाराजस्व समाधान शिबिर उपक्रम विधानसभा मतदारसंघ स्तरावर राबविण्यात येणार आहे.

सदर शिबिरात महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. तसेच विधानसभा स्तरावरील काही विशेष लाभांचे वितरणही सदर शिबिरामध्ये करण्यात येणार आहे.


त्यानुसार उमरगा-लोहारा विधानसभा स्तरावरील महाराजस्व समाधान शिबिर दिनांक 22 जुलै 2026 रोजी आदर्श महाविद्यालय उमरगा येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे.

सदर शिबिराचे उद्घाटन माननीय खासदार ओमप्रकाश निंबाळकर ,माननीय विधानपरिषद सदस्य श्री बसवराज पाटील, माननीय विधानसभा सदस्य मा. श्री प्रवीणकुमार स्वामी यांचे हस्ते व मा. जिल्हाधिकारी श्री कीर्ती कुमार पुजार मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियवंदा म्हादळकर अन् उमरगा लोहारा तालुक्यातील नगराध्यक्ष ,पंचायत समिती सभापती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
तसेच सदर महाराजस्व समाधान शिबिर सोबत मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष व शरण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये दोन्ही तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यविषयक विविध सेवा देण्यात येणार आहेत.तरी वरील दोन्ही शिबिराचे लाभ उमरगा व लोहारा तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी घ्यावे असे आवाहन मा. उपविभागीय अधिकारी उमरगा श्री दत्तू शेवाळे, मा.उपविभागीय अधिकारी लोहारा श्री सागर नन्नवरे ,तहसीलदार लोहारा श्री रणजितसिंह कोळेकर अन् तहसीलदार उमरगा श्री गोविंद येरमे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!