शैक्षणिक

कावेरी जाधवला राज्यस्तरीय बालचित्रकार पुरस्काराची बहुमानपूर्ण निवड

लोहारा : शिक्षक ध्येय’ या मासिकामार्फत आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत लोहाऱ्यातील कावेरी जाधवने उत्तुंग यश मिळवत बालचित्रकार पुरस्कार पटकावला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे आणि त्यांना चित्रकलेसाठी प्रोत्साहन मिळावे हा या स्पर्धेचा हेतू होता.

राज्यातील मोठ्या संख्येतील स्पर्धकांमध्ये तीन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. सहावी ते दहावी या गटात कावेरीने आपल्या कलात्मक सर्जनशीलतेच्या बळावर विजेतेपदाची बाजू मजबूत करत राज्यात चमकदार यश मिळवले.

कावेरीच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक काकासाहेब इंगळे यांनी तिच्या मेहनतीचे कौतुक करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षक बळीराम आलमले, प्रवीण शिंदे, मोईजोद्दीन सौदागर, सुरेश साळुंके, राहुल भेडे, सुनंदा निर्मले, मल्लिकार्जुन कलशेट्टी आणि हिना शेख यांनीही तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

कावेरीच्या यशामुळे संपूर्ण शाळा, शिक्षकवर्ग तसेच खेड गावात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र तिच्या कलागुणांची प्रशंसा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!