धाराशिव

लोहारा येथे युनियन बँकेचा १०७ वा वर्धापन दिन साजरा

लोहारा ( जि. धाराशिव ) : शहरातील युनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेला १०७ वर्षे पुर्ण होऊन यशस्वी वाटचाल चालू असल्याबद्दल शाखेत बँकेचे शाखा व्यवस्थापक संदीप विजयकुमार पुरी व बँकेच्या ग्राहकांच्या हस्ते (दि.११) केक कापून, मिठाई वाटून मोठ्या उत्साहात वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
यावेळी शाखा व्यवस्थापक संदीप पुरी, सहाय्यक शाखा व्यवस्थापक मुकेश जाधव, विशेष सहाय्यक विशाल बिरादार, रिलेशनशिप मॅनेजर (ग्राहक संबंध व्यवस्थापक) आकाश कातळे, प्रधान खजानची (कॅशियर) समीर शेळके, बँकेचे कर्मचारी बसय्या स्वामी, सचिन फताटे,, शेखर माणिकशेट्टी, हर्षवर्धन माणिकशेट्टी, उमेदचे प्रभाग समन्वयक सौरभ जगताप, ताई कुंभार, प्रभावती माने-जाधव, दत्ता जाधव, युनियन बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालक अशोक दुबे, यांच्यासह बँकेचे खातेदार, ठेवीदार, हितचिंतक, शेतकरी, व्यापारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!