महाराष्ट्र
शंभू महादेव यात्रेनिमित्त भातागळी येथे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा : एकूण 1 लाख 40 हजारांचे पारितोषिक

लोहारा : – लोहारा तालुक्यातील भातागळी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शंभू महादेव यात्रेनिमित्त राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. 15 व 16 एप्रिल 2025 रोजी जिल्हा परिषद प्रशाला, भातागळी येथे संध्याकाळी 6 वाजता ही स्पर्धा पार पडणार आहे. यामध्ये बालगट, मोठा गट, प्रौढ गट व मुलींसाठी खास लावणी गट अशा वेगवेगळ्या गटांमध्ये नृत्य स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धेतील एकूण पारितोषिकांची रक्कम तब्बल 1 लाख 40 हजार रुपये असून, वैयक्तिक व समूह नृत्य प्रकारांमध्ये स्पर्धकांना भरघोस बक्षिसे मिळणार आहेत.
स्पर्धेचे तपशील पुढीलप्रमाणे –
15 एप्रिल 2025 (मंगळवार) – बालगट स्पर्धा
वैयक्तिक नृत्य
-
-
प्रथम: ₹7000 (अजिंक्य बाबा पाटील)
-
द्वितीय: ₹5000 (भातागळीकर ज्वेलर्स)
-
तृतीय: ₹3000 (विक्रम जगताप)
-
-
समूह नृत्य
-
प्रथम: ₹11000 (सुलतान शेट)
-
द्वितीय: ₹7000 (आ. कैलास पाटील)
-
तृतीय: ₹5000 (आ. कैलास पाटील)
-
16 एप्रिल 2025 (बुधवार) – मोठा गट व प्रौढ गट स्पर्धा
-
मोठा गट वैयक्तिक नृत्य
-
प्रथम: ₹11000 (आ. प्रवीण स्वामी)
-
द्वितीय: ₹7000 (संजय पवार)
-
तृतीय: ₹5000 (तन्वी गर्ल्स हॉस्टेल)
-
-
प्रौढ गट समूह नृत्य
-
प्रथम: ₹21000 (आ. प्रवीण स्वामी)
-
द्वितीय: ₹15000 (डॉ. प्रतापसिंह पाटील)
-
तृतीय: ₹11000 (सचिन ज्वेलर्स, लोहारा)
-
लावणी नृत्य स्पर्धा (15 व 16 एप्रिल)
-
प्रथम: ₹11000 (सलीम गनी शेख)
-
द्वितीय: ₹9000 (मेहबूब पाशा गनी शेख)
-
तृतीय: ₹7000 (मुशरान गनी शेख)
-
चतुर्थ: ₹5000 (दिलीप पोटरे)
प्रवेश फी व अटी
-
बाल गट (वैयक्तिक व समूह): ₹251
-
मोठा गट, प्रौढ गट व लावणी: ₹301
-
नोंदणीची अंतिम तारीख: 14 एप्रिल 2025
-
वैयक्तिक नृत्य वेळ: 7 मिनिटे | समूह नृत्य वेळ: 10 मिनिटे
-
समूहासाठी 6 पेक्षा अधिक स्पर्धक असू नयेत