राजकीय

भाजपा लोहारा तालुक्याची संघटनात्मक ‘संघटन पर्व’ बैठक उत्साहात संपन्न

 

लोहारा (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाच्या लोहारा तालुक्याच्या संघटनात्मक सदस्यता नोंदणीसाठी ‘संघटन पर्व’ अंतर्गत विशेष बैठक संपन्न झाली. सदर बैठक भाजपा जिल्हा निवडणूक अधिकारी गुरुनाथजी मगे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, उमरगा-लोहारा विधानसभा निवडणूक प्रमुख राहुल पाटील, तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुतार कॉम्प्लेक्स, लोहारा येथे दिनांक 13 मार्च रोजी पार पडली.

या बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकारी गुरुनाथजी मगे, जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य आणि विधानसभा निवडणूक प्रमुख राहुल पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी भाजपा संघटन पर्व आणि सदस्य नोंदणी मोहिमेचे महत्त्व स्पष्ट करत कार्यकर्त्यांना अधिकाधिक नागरिकांना पक्षात सहभागी करून घेण्याचे आवाहन केले.

1000 नवीन सदस्य नोंदणीबद्दल सत्कार

भाजपा लोहारा तालुक्याच्या 1000 नवीन सदस्य नोंदणी अभियानात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल विधानसभा निवडणूक प्रमुख राहुल पाटील व भाजपा तालुका सरचिटणीस दगडू तिगाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

बैठकीस मान्यवरांची उपस्थिती

या बैठकीला जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे, विस्तारक शिद्धेश्र्वर माने, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस दगडू तिगाडे, शुभम साठे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी चव्हाण, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, तालुका उपाध्यक्ष दिलीप पवार, तालुका उपाध्यक्ष बालासिंग बायस, तालुका उपाध्यक्ष दत्ता कडबाने, तालुका उपाध्यक्ष बसवराज कोंडे, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष सौरभ कागे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विरेंद्र पवार, युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, तालुका चिटणीस युवराज जाधव, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सुयश दंडगुळे, प्रसिद्धीप्रमुख निकेश बचाटे, ओबीसी तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, तसेच मोहन जेवळीकर, संजय कदम, परमेश्वर कदम, मुरलीधर होनाळकर, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष मल्लीनाथ फावडे, राम साठे, सचिन हत्ते, गणेश रवळे, संतोष मुर्टे, गोवर्धन मुसांडे, गोविंद यादव, बालाजी कदम, बालाजी घोडके, शंभू सुतार यांसह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीचे सूत्रसंचालन विस्तारक शिद्धेश्र्वर माने यांनी केले, तर आभार तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे यांनी मानले. भाजपाच्या आगामी सदस्य नोंदणी मोहिमेसाठी ही बैठक मार्गदर्शक ठरणार आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!