लोहारा – : शिवसेनेचे मुख्य नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये शिवसेना पक्षातर्फे राबवण्यात येत असलेले शिवकार्य-शिवसेना सदस्य नोंदणी अभियाना संदर्भात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय लोहारा येथे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली.
बैठकीत माजी खासदार रवींद्र गायकवाड हे मागदर्शन करत असताना शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यांतील कानाकोपऱ्यांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवणे या उद्देशाने ‘शिवकार्य शिवसेना’ सदस्य नोंदणी अभियान राबवावे असे आवाहन यावेळी सर्व उपस्थितांना केले.
या बैठकीस युवासेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, नगराध्यक्षा वैशाली खराडे, तालुकाप्रमुख जगन पाटील, उपनगराध्यक्ष अमीन सुंबेकर, प्रताप लोभे, अमोल पाटील, दत्ता मोरे, महीला आघाडी शहर प्रमुख रितू गोरे, सर्व नगरसेवक नगर पंचायत लोहारा, सर्व उप तालुका प्रमुख, विभागप्रमुख, गणप्रमुख, युवासेना, महीला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!