लोहारा : दुभती गाय चोरीला जावून पाच महिने झाले. तरी गायीचा शोध घेतला नाही. तपासाचे काय झाले, असे विचारल्यानंतर पोलिस धमकावत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आज बुधवारी १ जानेवारी रोजी लोहारा पोलीस ठाण्याच्या गेटवर अत्महत्या करण्याच्या उद्देशाने पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आला असता. पोलीसांनी पेट्रोलच्या बाटल्या हिसकावून घेत शेतकऱ्यांला ताब्यात घेऊन त्यांचेवर भा. ना. न्या. संहिता कलम १२६ प्रमाणे तहसिलदार यांच्याकडे कार्यवाही करण्यात आली आहे.