लोहारा ( जि.धाराशिव ) : लोहारा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-अशोक रामराव गव्हाळे, (वय 59 वर्षे, रा. खेड ता. लोहारा जि. धाराशिव ) यांनी पाळलेला 4 वर्षाचा तांबड्या रंगाचा कुत्रा यास आरोपी नामे-जिलानी महेबुब शेख, ( रा.खेड ता. लोहारा जि. धाराशिव ) यांनी दि.25.12.2024 रोजी 19.00 वा. सु. खेड शिवारातील शेत गट नं 61/1 येथे दारु पिवून येवून काठीने मारहाण करुन जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अशोक गव्हाळे यांनी दि. 26.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या. सं. कलम 325 सह प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11(1)(एल) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.