लोहारा (जि.धाराशिव ) : दिनांक 22/12/2024 रोजी सोलापूर याठिकाणी आयडियल प्ले अबॅकस इंडिया प्रा. लि. यांच्यामार्फत राज्यस्तरीय गणित अबॅकस स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सिनियर के.जी. या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कु.अरोही विनोद जोकार हिने चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवून प्रमाणपत्र व ट्रॉफीसह यश प्राप्त केले आहे. यापुढील राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी कोल्हापूर याठीकाणी होणार आहे. तिच्या या यशाबद्दल स्कुलचे मुख्याध्यापक श्री शहाजी जाधव, संचालिका सौ सविता जाधव आणि मार्गदर्शक शिक्षिका कोमल जोकार व पालक पोलिस निरीक्षक श्री विनोद जोकार यांनी अभिनंदन करून भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.