शैक्षणिक

न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक ध्यान दिवस साजरा

लोहारा ( जि.धाराशिव ) : दिनांक 21 डिसेंबर रोजी जागतिक ध्यान दिवस निमित्त लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थांनी ध्यान केले. यावेळी स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव यांनी भारतीय संस्कृतीमध्ये ध्यानाचे काय महत्व असून ध्यान केल्याने मानवी जीवनात आमूलाग्र परिवर्तन होते. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीने थोडा वेळ स्वतःसाठी काढून ध्यान करणे खूपच गरजेचे , ध्यानाने जीवन आनंददायी बनते तसेच जीवनात शांतीमय अनुभव येते. अशा अनेक प्रकारच्या फायद्यामुळे ध्यानाचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. यावेळी स्कुलमधील सर्व विध्यार्थी , शिक्षक कर्मचारी यांनी ध्यान करून याचा अनुभव घेतला.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!