शैक्षणिक

आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित

धाराशिव : लोहारा तालुक्यातील सास्तुर निवासी दिव्यांग शाळेतील संध्या गुंजारे,कपिल रेड्डी, निवृत्ती सूर्यवंशी,किरण मैंदर्गी आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, धाराशिव यांच्या कडून जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आदर्श शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून निवासी दिव्यांग शाळेतील शिक्षक श्रीमती संध्या किशनराव गुंजारे यांनी दिव्यांग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह धाराशिव येथे समारंभपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचारी निवृत्ती चंदर सूर्यवंशी यांनाही आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याबरोबरच श्री शांतेश्वर दिव्यांग कौशल्य विकास संस्था सास्तुर येथील संगणक प्रशिक्षक कपिल संजीव रेड्डी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार,तर किरण सागर मैंदर्गी यांना आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सदर पुरस्कार जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खामितकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी धाराशिव जिल्हा दिव्यांग संस्थाचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. बी.आर.कलवले, प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, महाराष्ट्र दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव शिंदे, आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे दिव्यांग शेलचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शिंदे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर, कार्यालयीन अधिक्षक मोहन चव्हाण, सहाय्यक लेखाधिकारी सुधीर जाधवर, संस्थाचालक शहाजी चव्हाण, चंद्रकांत जाधव, जुनेद शेरीकर,रशीद कोतवाल,बालाजी शिंदे, नितीन सरवदे,गोरख शिंदे, प्रहारचे बाळासाहेब पाटील, जमीर शेख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

सदर पुरस्कार प्राप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भागवतराव बदामे, प्रशालेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे, व्यवस्थापकीय अधिक्षक भरत बालवाड यांनी कौतुक केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!