लोहारा ( धाराशिव ) : / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री पदाची शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्टवादी कॉग्रेस चे नेते अजित (दादा) पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने लोहारा तालुका भाजपाच्या वतीने लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्याची आतषबाजी मोठ्या प्रमाणात करुण घोषणाबाजी करण्यात आली. व तसेच एकमेकांना पेढे भरवुन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजपा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, युवा वारीयर जिल्हा संयोजक शुभम साठे, माजी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, सरचिटणीस इकबाल मुल्ला, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी चव्हाण, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शब्बीर गवंडी, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, तालुका उपाध्यक्ष दिलीप पवार, सरपंच व्यंकट कागे (भोसगा), विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष योगिराज कारभारी, ग्रामपंचायत सदस्य लखन चव्हाण(अचलेर), शहराध्यक्ष बाबा सुंबेकर, मोहन जेवळीकर, काशीनाथ घोडके, तालुका चिटणीस युवराज जाधव, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, विष्व हिंदु परिषद प्रखंड मंत्री दत्तात्रय सलगरे, प्राचार्य शहाजी जाधव, अॅड. रविकांत भोंडवे, परमेस्वर कदम, प्रशांत माळवदकर, व्यापारी तालुकाध्यक्ष मल्लीनाथ फावडे, बुद्धीजीवी प्रकोष्ठ जिल्हा संयोजक प्रमोद पोतदार, कल्याण ढगे, शिवाजी पवार, बलभीम पाटील, बालाजी मल्लीनाथ माशाळकर, संजय कदम, सिद्धेश्वर बिडवे, सिद्राम नरुणे, कृष्णा हंडे, शरद पवार, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.