राजकीय

राजकारणातील सामाजिक वाटा उपेक्षतांनाच द्यावा – महेश देशमुख

उमरगा प्रतिनिधी

उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघांमध्ये कागदोपत्री काही जातींचा अनुसूचित जाती मध्ये समावेश आहे. त्यांनी नोकरीमध्ये त्याचा फायदा घेतलेला आहे.जरी ह्या कागदोपत्री अनुसूचित जातीमध्ये आल्या आहेत.परंतु प्रत्यक्षात यांनी कधी अस्पृश्यतेचे चटके सहन केलेले नाहीत.मूळ अनुसूचित जाती मधल्या लोकांनी या पद्धतीने निष्कर्तपनाचे जिने जगले. बहिष्कृत म्हणून हजारो वर्ष गावकुसाबाहेर राहिले, अन्याय अत्याचार सहन केला, या पद्धतीचे जीवन वरील समाजाच्या वाट्याला आलेले नाही त्यामुळे राजकारणामधील सामाजिक वाटा त्यांच्या त्यांना देण्यात येऊ नये.राजकारणातील अनुसूचित जाती (एससी) साठी आरक्षणाचा उद्देश सर्व जातीतील लोकांना सरकारमध्ये समान प्रतिनिधित्व मिळावे आणि अनुसूचित जाती जमातींना सशक्त बनवण्यासाठी आहे. कायद्याचा गैरफायदा इतर लोकांनी घेवून मुळ अनुसूचित जातीवर अन्याय होइल असं वर्तन करु नये.

महाविकास आघाडीचा घटक म्हणून मी महाविकास आघाडीचेच काम करणार आहे.तरीपण महाविकास आघाडीतील पक्षांनी उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जातीतील बौद्ध, मातंग, चर्मकार, ढोर या समाजातील उमेदवारांना प्रधान्य द्यावे.

महेश देशमुख
राष्ट्रीय समन्वयक युवक काँग्रेस

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!