धाराशिव : मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या आदेशावरुन काल शनिवारी दि.19.10.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 21 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 3,880 लि. द्रवपदार्थ नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर सुमारे 434 लि. गावठी दारु, सुमारे 625 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव व देशी- विदेशी दारुच्या एकुण 56 बाटल्या असे मद्य जप्त केले. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 3,67,730₹ आहे. यावरुन 21 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 21 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1)धाराशिव ग्रामीण पो ठाणेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-छगन सोमा पवार, वय 51 वर्षे, रा. वरुडा पारधी पिडी ता. जि. धाराशिव हे 09.50 वा. सु. वरुडा येथे अंदाजे 9,800 ₹ किंमतीची 35 लि. गावठी दारु व 380 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-रोहीत भुजंग पवार, वय 20 वर्षे, रा.गावसुद ता. जि. धाराशिव हे 10.30 वा. सु.गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 30,000 ₹ किंमतीचे 600 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रवअवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-सचिन बिभीषण कांबळे, रा. आंबेजवळगा ता. जि. धाराशिव हे 18.30 वा. सु.आंबेजवळगा ते कौडगाव जाणारे रोडचे उजवे बाजूस अंदाजे 5,000 ₹ किंमतीची 100 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रवअवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
2) उमरगा पो ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-संजय किसन चव्हाण,रा. पळसगाव तांडा ता. उमरगा जि. धाराशिव हे 08.00 वा. सु. पळसगाव साठवण तलावाचे पुर्व काठालगत बाजूस अंदाजे 94,500 ₹ किंमतीचे 2400 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 75 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-रियाज हुसेन शेख, वय 38 वर्षे, रा.हनुमान नगर शासकीय झोपडपट्टी उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 08.45 वा. सु. उमरगा शिवारातील धनु निवृत्ती राठोड यांच्या शेताजवळ अंदाजे 97,000 ₹ किंमतीची गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
3)बेंबळी पो. ठाणाच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-धर्मराज उर्फ गुरु फुलचंद भोसले, वय 31 वर्षे, रा. गोगाव ता. जि. धाराशिव या 11.40 वा. सु करजखेडा शिवारातील सोपान माळी यांचे शेतात रोडच्या कडेला पत्र्याच्या शेडमध्ये अंदाजे 6,000 ₹ किंमतीची 60 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-अंकुश रामा मस्के, वय 65 वर्षे, रा.काजळा ता.जि. धाराशिव हे 16.30 वा. सु चिखली पेट्रोल पंप पुर्वेस मेजरसाब कॉम्पलेक्स समोर मोकळ्या जागेत अंदाजे 8,500 ₹ किंमतीची 85 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
4)धाराशिव शहर पो. ठाणाच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-राहुल मुरलीधर भालेराव, वय 38 वर्षे, रा. गणपती मंदीराचे पाठीमागे तांबरी विभाग धाराशिव ता. जि. धाराशिव हे 15.30 वा. सु प्रसाद किराणा दुकानाच्या बाजूला इंदीरानगर धाराशिव येथे अंदाजे 22,000₹ किंमतीची 220 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-रिजवान अमीन शेख, वय 26 वर्षे, आसेफ नबी तांबोळी दोघ रा. झोरे गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव हे 19.05 वा. सु तुळजापूर नाक्याकडे जाणारे रोडवरती धराशिव येथे अंदाजे 25,000₹ किंमतीची 250 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
5)लोहारा पो. ठाणाच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-ईस्माईल सय्यद शेख, वय 36 वर्षे रा. जेवळी उत्तर ता. लोहारा जि. धाराशिव हे 20.00 वा. सु ईस्माईल बिर्याणी हॉटेल समोर अंदाजे 4,200 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-सौरभ दिनेश बनसोडे, वय 23 वर्षे, रा. जेवळी उत्तर ता. लोहारा जि. धाराशिव हे 20.00 वा. सु जेवळी गावातील चरणकमल हॉटेलचे बाजूसअंदाजे 10,760 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
6) अंबी पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-उमेश लहु इटकर, रा.सोनारी ता. परंडा जि. धाराशिव हे 16.00 वा. सु हॉटेल सागरच्या पाठीमागे आडोशाला सोनारी येथे अंदाजे 980 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
7)भुम पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-आशाबाई दत्ता काळे, वय 35 वर्षे, रा. आरसोली ता. भुम जि. धाराशिव या 17.45 वा. सु आरसोली येथील मोबाईल टॉवरचे जवळ पत्राचे शेडसमोर अंदाजे 3,000₹ किंमतीची 30 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
8)वाशी पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-संगीता रमेश शिंदे, वय 38 वर्षे, रा. चिरकाड पारधीपिडी पारा ता. वाशी जि. धाराशिव या 17.40 वा. सु चिरकाड पारधी पिडी पारा येथे अंदाजे 3,350₹ किंमतीची 35 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
9) ढोकी पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-मनिषा अशोक चव्हाण,रा. पेट्रोलपंप चज्ञैक ढोकी ता. जि. धाराशिव या 17.30 वा. सु पेट्रोपंप चज्ञैक ढोकी येथील तेरकडे जाणारे रोडलगत अंदाजे 2,450₹ किंमतीची 70 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेने जप्त करण्यात आले.
10) मुरुम पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-भिमाशंकर अमश्त ब्याळीकुळे, वय 30 वर्षे,रा.आलुर ता. उमरगा जि. धाराशिव हे 17.30 वा. सु आलुर ते कुन्सावळी जाणारे रोडचे डावे बाजूस गुरप्पा बोळदे यांचे पत्राचे शेडचे समोर अंदाजे 3,300 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या व 26 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
11) शिराढोण पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-आजम अंजार दखणी, वय 29 वर्षे,रा.शिराढोण ता. कळंब जि. धाराशिव हे 18.15 वा. सु शिराढोण येथील आवाड शिरपुरा पाटी येथेमहाराष्ट्र हॉटेल जवळ अंदाजे 2,300 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 28 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
12) येरमाळा पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-प्रमोद बाबासाहेब घोलप, वय 36 वर्षे,रा.तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव हे 17.15 वा. सु तेरखेडा येथील एनएच 52 हायवे ब्रिज जवळ गावात जाणारे रोडलगत असलेल्या भुजावरचृया नविन पत्राच्या गाळ्या मध्ये अंदाजे 7,800 ₹ किंमतीची गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
13) आनंदनगर पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-चंपा बब्रु काळे, वय 68 वर्षे,रा. रामनगर सांजा ता.जि. धाराशिव या 18.15 वा. सु रामनगर सांजा रोडच्या कडेला मोकळ्या जागेत अंदाजे 5,400 ₹ किंमतीची 50 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
14) तुळजापूर पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-लक्ष्मीबाई हणुमंत पवार, वय 60 वर्षे,रा. वासुदेव गल्ली तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव या 19.30 वा. सु वासुदेव गल्ली गुरुमाउली लॉज समोरील पत्राचे शेडचे कोपऱ्यात रोडचे बाजूस तुळजापूर येथे अंदाजे 10,190 ₹ किंमतीची 123 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
15) नळदुर्ग पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-किरण धोंडीबा राठोड, वय 30 वर्षे,रा. येडोळा तांडा जि. धाराशिव हे 19.15 वा. सु येडोळा ता. तुळजापूर शिवारात बालाजी फुके यांचे शेताजवळ खंडाळा नदीचे पात्रात अंदाजे 16,200 ₹ किंमतीची 400 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
Back to top button
error: Content is protected !!