महाराष्ट्र

लातूर मुंबई एक्सप्रेसला सकाळच्या सत्रा मध्ये लातूर ते हडपसर पुणे दरम्यान इंटरसिटी ट्रेन सुरू करा – खासदार डॉ.शिवाजीराव काळगे

 

धाराशिव : आज सोमवारी लातूरचे खासदार डॉ.शिवाजीराव काळगे यांची श्री. धरम वीर मीना (महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई) यांच्याशी रेल्वेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली.

लातूरचे खासदार डॉ.शिवाजीराव डॉ.काळगे यांनी पुढीलप्रमाणे विनंती केली.

– दिवाळी दरम्यान नवीन सणासुदीच्या गाड्या सुरू करावे.

– नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करावी.

– लातूर-मुंबई आणि नांदेड-पनवेल ट्रेनसाठी अतिरिक्त रेल्वे डबे, अनुक्रमे 16 वरून 24 आणि 13 ते 24 पर्यंत वाढवावे.

– मछलीपट्टणम गाडीचा बिदर ते लातूर स्थानकापर्यंत विस्तार करावे.

– लातूर रोड ते लातूर दरम्यान अतिरिक्त क्रॉसिंग ट्रॅकचे बांधकाम करावे.

– लातूर एक्स्प्रेसला मुरुड स्थानकावर थांबा द्यावा.

– उत्तर भारताशी संपर्क साधण्यासाठी नवीन ट्रेन सुरू करावी.

– लातूर मुंबई एक्सप्रेसला सकाळच्या सत्रा मध्ये लातूर ते हडपसर पुणे दरम्यान इंटरसिटी ट्रेन सुरू करावी.

– बिदर ते एलटीटी मुंबईसाठी अतिरिक्त दैनंदिन ट्रेन सुरू करावी.

– छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – गोवा आणि नागपूर-गोवा ट्रेन व्हाया लातूर करावी.

तरी डॉ. काळगे यांनी केलेल्या मागण्यांना श्री. धरम वीर मीना यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरात लवकर मागण्या पूर्ण करू असे सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!