राजकीय
कॉंग्रेस सोशल मिडिया विधानसभा अध्यक्षांची निवड

लोहारा / उमरगा : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्षा मा. श्रीमती सुप्रिया श्रीनेत यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या विधानसभा अध्यक्ष यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असुन २४०-उमरगा विधानसभा अध्यक्षपदी तालुक्यातील होळी ग्रामपंचायत सदस्य केशव सरवदे यांची निवड करण्यात आली आहे. सरवदे हे गेल्या तेवीस वर्षांपासून कॉंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते असुन
HTML img Tag

पक्षाच्या माध्यमातून लोहारा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, कॉंग्रेस पक्षाचे अनु. जाती विभागचे लोहारा तालुकाध्यक्ष व सलग चार वेळा होळी ग्रामपंचायत सदस्य म्हणून आशा अनेक पदावर त्यांनी काम केले आहे. पक्षाचे ध्येय धोरणे व विचार आणि सोशल मिडिया च्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न, सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून युवकांना संघटीत करण्यासाठी त्यांची पक्षनिष्ठा व प्रामाणिकपणा लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांची निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.



