लोहारा : लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास सरपंच भाग्यश्री पाटील, उपसरपंच हुसेन शेख, ग्रामपंचायत सदस्य मनोज देशपांडे, परमेश्वर भालेराव, नितीन देशपांडे, शिपाई बबन बाबर, संतोष भालेराव, अण्णाराव देशपांडे, महेश देशपांडे आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.
यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक कार्याचा व साहित्यिक योगदानाचा उजाळा देत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.