लोहारा (जि. धाराशिव) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिनांक २२ जुलै रोजी लोहारा शहरातील श्रीगिरे हॉस्पिटल येथे ‘महारक्तदान शिबिर’ आयोजित करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून ५० जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार रणजीतसिंह कोळेकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, डॉ. हेमंत श्रीगिरे, माजी उपाध्यक्ष प्रवीण चव्हाण, किसान मोर्चा माजी अध्यक्ष बालाजी चव्हाण, माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील, पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष अनिल ओवांडकर, प्रसिद्धीप्रमुख व संयोजक निकेश बचाटे, नगरसेवक प्रशांत काळे, दिपक मुळे, हरी लोखंडे, बाबा सुंबेकर, दत्ता कडबाने, प्रमेश्वर माशाळकर, प्रशांत माळवदकर, प्रमोद पोतदार, युवराज जाधव, दगडु तिगाडे, काशीनाथ घोडके, कल्याण ढगे, प्राचार्य शहाजी जाधव, शंकर जाधव, सोहेल कोतवाल, संतोष फरिबादकर, परमेश्वर कदम, विक्रम औटी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात सह्याद्री ब्लड बँक, धाराशिव यांच्या वतीने सोहेल कोतवाल, सानिया पटेल, ऐश्वर्या आडसुळ, अपेक्षा परसे, सबा तांबोळी यांनी रक्त संकलनाचे कार्य पार पाडले. शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले.
Back to top button
error: Content is protected !!