लोहारा ( जि. धाराशिव) : स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ITI महाविद्यालयात दिनांक 26 जुलै रोजी कारगिल विजय दिन व शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संतोष कांबळे होते. प्रमुख वक्ते म्हणून बसवेश्वर विद्यालय उमरगा येथील शिक्षक रामदास कुलकर्णी, तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक जालिंदर कोकणे, सामाजिक कार्यकर्ते हाजी बाबा शेख, IMC संस्था सदस्य श्रीनिवास माळी, शहाजी जाधव, अभिमान कांबळे, श्रीधर ढगे, वीरपत्नी मंगल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर कारगिल युद्धातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाविद्यालयातर्फे उपस्थित वीरपत्नी मंगल सतीश कुलकर्णी, माजी सैनिक सुमन राम लांडगे, संजीवनी सुधाकर पाटील, उदय कुलकर्णी, मुकेश जाधव यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक प्राचार्य संतोष कांबळे यांनी केले.
IMC सदस्य शहाजी जाधव यांनी बोलताना विद्यार्थ्यांना नव्या ट्रेड्ससह अद्ययावत साहित्य व सुविधा उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला. वक्ते रामदास कुलकर्णी यांनी आपल्या प्रभावी भाषणात कारगिल युद्धातील पराक्रम, भारतीय संस्कृती, शौर्य, भारतीय इतिहास, स्थापत्यकला, आयुर्वेद व गुरुकुल शिक्षणपद्धती याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित भोसले तर आभार प्रदर्शन विकास बालकुंदे यांनी केले. या कार्यक्रमाला निवृत्त पोलीस अधिकारी दत्तात्रय झिंगाडे, शिक्षक केतन पांचाळ, राजकुमार यादव, इरफान शेख यांच्यासह विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.