धाराशिव
अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळलेल्या तुळजापूर ,उमरगा, लोहारा, भूम या तालुक्याचा सुधारित अहवाल शासनाला तातडीने द्या अन्यथा संघर्ष अटळ
अनिल जगताप यांचा प्रशासनाला इशारा

धाराशिव : जिल्हा प्रशासनाने नुकताच धाराशिव जिल्हा अतिवृष्टी व स्वतःच्या पावसाने 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची माहिती व अनुदान प्रस्ताव शासनाला पाठवला आहे त्यात एक लाख 80 हजार 786 शेतकऱ्यांना एक लाख 63 हजार 67 हेक्टर क्षेत्रासाठी 221 कोटी 50 लाख रुपये मिळणार असल्याचे नमूद केले आहे. मात्र आश्चर्यकारक बाब ही की ,यात तुळजापूर ,उमरगा, भूम या तालुक्यात एक हेक्टर देखील क्षेत्राचे नुकसान झाले नसल्याचे नमूद केले आहे तसेच लोहारा तालुक्यात केवळ 370 शेतकऱ्यांना 298 हेक्टर क्षेत्र नुकसानीपोटी केवळ 55 लाख रुपये मिळणार आहेत. हा अहवाल सप्टेंबर शेवटपर्यंत झालेल्या नुकसानी कोटी असल्याचाही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र दाखल केलेल्या या प्रस्तावामुळे अर्धा धाराशिव जिल्हा मदतीपासून वंचित राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
डोळ्याला दिसणारे वास्तववादी चित्र या विरुद्ध प्रशासनाचा अहवाल.
33% पेक्षा जास्तीचे नुकसान झाले असल्याचे प्रत्यक्ष दिसत असताना देखील, प्रशासन मात्र नुकसान झाले नसल्याचा विचित्र अहवाल देते त्यामुळे शेतकऱ्यातून आश्चर्य व्यक्त होत असून अशा कार्यपद्धती विषयी नाराजी दिसून येत आहे खरं म्हणजे ऑक्टोबर महिन्यातील एक व दोन ऑक्टोबर तारखेपर्यंतचे नुकसानीचे चे अहवाल घेऊन एकत्रित शासनाकडे माहिती पाठवली असती तर ते अधिकचे सोयीचे झाले असते मात्र तसे न करता अर्धवट अहवाल पाठवला गेला आहे.