लोहारा ( जि. धाराशिव) : आज दिनांक 23 जुलै 2025 रोजी पंचायत समिती लोहारा येथे बदली झालेल्या अधिकाऱ्यांचा निरोप व स्वागत समारंभ भावूक वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची अध्यक्षता गटविकास अधिकारी मा. जे.टी. वग्गे साहेबांनी केली. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार मा. रणजीतसिंह कोळेकर साहेब उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी उमरगा मा. गणेश पवार साहेब, गटविकास अधिकारी शितल खिंडे मॅडम, विस्तार अधिकारी श्री सतीश शेडगर, सहाय्यक लेखाधिकारी श्री कुलकर्णी, विस्तार अधिकारी (कृषी) श्री गोपालसिंग राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.

बदलीने उमरगा पंचायत समितीकडे गेलेल्या ग्रामपंचायत अधिकारी श्री गंगाधर इंगळे, श्री नेताजी मारेकर, मुरुगप्पा नीलगार, बी.जे. गौतम या अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला उत्तर देताना उपविभागीय अधिकारी मा. गणेश पवार साहेब म्हणाले की, “महसूल विभागाच्या तुलनेत पंचायत समिती लोहारा यांचा निरोप समारंभ अधिक प्रभावी आणि आत्मीयतेने भरलेला आहे. येथे आल्यावर सासरवाडीत असल्यासारखे वाटले.”
गटविकास अधिकारी शितल खिंडे मॅडम यांनी आपल्या भाषणात भावूक होत उपस्थितांचे मन जिंकले. त्या म्हणाल्या, “माझ्या तीन वर्षांच्या कार्यकाळात सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मला भरभरून सहकार्य केले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून तालुक्याचे कामकाज जिल्ह्यात सर्वोत्तम ठरले.”
त्यांनी शेवटी अत्यंत भावुक होत सांगितले की, “शासनाच्या योजना शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे योगदान अमूल्य होते.”
हा समारंभ स्मरणात राहावा असा ठरला असून, उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी व अंतःकरणात कृतज्ञता होती.
Back to top button
error: Content is protected !!