लोहारा : प्रतिनिधी
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप 2024 च्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या 86 कोटी 43 लाख रुपयांचे अनुदान मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे शेतकरी नेते अनिल दादा जगताप यांचा उंडरगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी गावचे उपसरपंच हिराचंद मोरे, ग्रामपंचायत सदस्य भूमेश पवार, सोसायटी चेअरमन युवराज तोडकरी, रोजगार सेवक शिवाजी सूर्यवंशी, शालेय समिती अध्यक्ष रंगनाथ जाधव, शेतकरी श्री. साखरे, गणेश सूर्यवंशी, पंडित चव्हाण, सागर ढवळे, समाधान भुसारे, गौतम साठे, शहाजी सूर्यवंशी, रंगनाथ गंगणे, नारायण सूर्यवंशी, हरीण साठे, बालाजी गंगणे, नागनाथ गिरी, बाबा पाटील, लखन ढवळे, महेश ढवळे, नागेश गंगणे, दादा पाटील, सुमित सूर्यवंशी, विठ्ठल सूर्यवंशी, राजेंद्र बिराजदार, कुंडलिक सूर्यवंशी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा करून शासनदरबारी आवाज पोहोचवणाऱ्या अनिल दादा जगताप यांचे विशेष कौतुक करण्यात आले. या प्रसंगी त्यांनीही ग्रामस्थांचे आभार मानत, “शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हेच माझे काम आहे,” असे भावनिक उद्गार काढले.