लोहारा (प्रतिनिधी) – लोहारा शहरातील उत्साही आणि नावारूपाला आलेल्या किंग कोब्रा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने याही वर्षी 2025 मध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यानिमित्त मंडळाची कार्यकारिणी निश्चित करण्यासाठी मंडळाची नियोजन बैठक नुकतीच संपन्न झाली.
ही बैठक कोब्रा बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. दत्ता निर्मळे, सचिव गोपाळ सुतार सर तसेच मार्गदर्शक विठ्ठल वचने सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बैठकीत सर्व सदस्यांच्या उपस्थितीत व एकमताने मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
2025 च्या गणेशोत्सवासाठी कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे –
अध्यक्ष: गगण माळवदकर
उपाध्यक्ष: गिरीश जट्टे
सचिव: ओम पाटील, ईश्वर बिराजदार
मिरवणूक प्रमुख: देवा महाजन, श्याम कोरे, महेश चपळे, जितेश कुलकुर्ते
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मंडळ सदस्यांनी हार्दिक अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. गणेशोत्सव अधिक भव्य आणि संस्कृतीसन्मानक पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमात लवकरच गणेशमूर्ती आगमन, आरास सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांची आखणी करण्यात येणार असल्याचे संकेत अध्यक्ष गगण माळवदकर यांनी दिले. लोहारा व परिसरातील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.