महाराष्ट्र

जेवळी मंडळ अधिकारी श्री मल्लिनाथ स्वामी यांचा निवृत्ती सोहळा संपन्न

 लोहारा / उमरगा : दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी लोहारा तहसिल कार्यालयात गुंजोटी गावचे सुपुत्र श्री मल्लिनाथ स्वामी हे 1990 मध्ये तलाठी म्हणून शासकिय सेवेत रुजू झाले, त्यांच्या 34 वर्षांच्या अखंड सेवेतून मंडळाधिकारी म्हणून शासनाच्या नियत वयोमानानुसार निवृत्त झाले, त्यांच्या निवृत्तीचा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहारा तहसीलचे नायब तहसिलदार श्री नानासाहेब मोरे , अ.का.श्री अशोक शिंदे, लोहारा तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष श्री दिपक रेड्डी, मंडळाधिकारी श्री बी.एस. भरणाळे , श्री हणमंत जमादार, श्री शहाजी साळुंके, श्री विद्याधर कोळी, श्री वजीर अत्तार,श्री शहाजी जाधव, श्री राजू तोरकडी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री मल्लिनाथ स्वामी यांचा सहकुटुंब शॉल, श्रीफळ, आहेर, भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. यावेळी महसूल विभागातील त्यांचे अधिकारी व सहकारी यांनी त्यांच्या कार्याची माहिती देवून एक सतत हसतमुख असणारे, अजातशत्रू असणारे व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती म्हणजे स्वामी साहेब असे कौतुक करून आपले मनोगतामध्ये सांगितले तसेच त्यांच्या भविष्यातील आयुष्य आनंदी, सुखी, समाधानी आणि कुटुंबासोबत जावो, अशा शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी श्री स्वामी यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना आपल्या कार्यकाळात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले, योग्य ठिकाणी मार्गदर्शन केले असे महसूल विभागातील अधिकारी,सहकारी, कर्मचारी यांचे आणि उपस्थित सर्वांचेच मनापासून आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री भागवत गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन श्री अशोक शिंदे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!