नव्या जुन्याचा मेळ साधत भाजपची लोहारा तालुका कार्यकारिणी जाहीर

लोहारा ( जि.धाराशिव ) : जिल्हा अध्यक्ष संताजी (काका) चालुक्य पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे लोहारा तालुका अध्यक्ष शिवशंकर हत्तरगे लोहारा भाजपाची नूतन कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत पाच उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस तर सात चिटणीसांचा समावेश आहे. हे नूतन कार्यकारिणी लोहारा भाजपाचे संघटन वाढवून आगामी काळात भाजपमय करेल असा विश्वास हत्तरगे यांनी व्यक्त केला. या नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून संपत देवकर ,दीलीप पवार, प्रवीण चव्हाण, भरत जाधव, शिवाजी दंडगुले, बालासिंग बायस, दत्ता कडबाने यांची निवड घोषित करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी दगडू तिघाडे, विष्णू लोहार, इक्बाल मुल्ला यांना संधी देण्यात आली आहे. युवराज जाधव, सुरेंद्र काळाप्पा, अनिल आतनुरे बसवराज कोंडे, उमेश सोनवणे, किशोर राजपुत यांच्याकडे चिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कोषाध्यक्ष म्हणून श्रीकांत सुर्यवंशी तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून निलेश बचाटे , आयटी व सोशल मीडिया प्रमुख पदी जयेश सुर्यवंशी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष पदी विरेंद्र पवार, महिला मोर्चा अध्यक्ष पदी , सौ संजीवनी बुर्ले यांची नियुक्ती करण्यात आली आहे व भाजपा विविध आघाडी व मोर्चा पदी ३५ पदाधिकारी यांची नियुक्त करण्यात आले आहे. या सर्व पदाधिकार्यांना नियुक्तीपत्रे प्रदान केली जातील असं भाजपच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.