धाराशिवकृषी

एकोंडी लो येथे पशुसंवर्धन विभागातर्फे पशुपालक प्रशिक्षण; प्रमाणपत्रांचे वितरण

लोहारा : तालुक्यातील एकोंडी लो येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तसेच जनाई मिल्कचे चेअरमन अजित पाटील यांच्या पुढाकारातून पशुपालकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात पशुसंवर्धन विषयक विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले तसेच सहभागी पशुपालकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.


कार्यक्रमास पंचायत समिती सभापती पल्लवी जानकर, उपसभापती अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी कोकणे, सरपंच सुलक्षणा सुरवसे, उपसरपंच विकास पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी वाघे, सामाजिक कार्यकर्ते धीरज घोटाळे, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक महादेव जगताप, जनाई मिल्कचे चेअरमन अजित जाधव पाटील, प्रकल्प अधिकारी डॉ. इंगळे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गुजेवाड, नरेंद्र पाटील, जगदीश जाधव, दिनकर जाधव, शिवदर्शन मुळे, विवेक बिराजदार, मनोज पाटील यांच्यासह गावातील शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रशिक्षणादरम्यान पशुपालनातील आधुनिक तंत्रज्ञान, जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन, दुग्धव्यवसायातील संधी तसेच शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. उपस्थितांनी अशा उपयुक्त प्रशिक्षण उपक्रमांचे स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!