महाराष्ट्र

अमूलनंतर आता आरोक्या दूध व हटसन दहीही महागणार; इंधन दरवाढीचा परिणाम

सोलापुर : अमूल दूधाच्या दरवाढीनंतर आता आरोक्या दूध व हटसन दही यांच्या किंमतीतही वाढ करण्यात आली आहे. वाढते इंधन दर, वाहतूक खर्च आणि उत्पादन खर्च यामुळे येत्या २५ मे २०२६ पासून विविध उत्पादनांच्या दरात प्रत्येकी २ रुपयांची वाढ लागू होणार असल्याची माहिती वितरकांकडून देण्यात आली.

नवीन दरवाढीनुसार एसएम ५०० मिली दूध, टीएम ५०० मिली दूध, हटसन कर्ड २०० मिली दही तसेच हटसन कर्ड ५०० मिली दही यांच्या किंमतीत वाढ होणार आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावरही होत असल्याचे सांगितले जात आहे.

दूध संकलनापासून ते ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचविण्यापर्यंत वाहतुकीवर मोठा खर्च होत असल्याने कंपन्यांना दरवाढ करावी लागत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर पॅकेजिंग साहित्य व पशुखाद्य दरवाढीचाही परिणाम दुग्ध उत्पादन खर्चावर झाला आहे.

दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या मासिक खर्चात काही प्रमाणात वाढ होणार असून चहा विक्रेते, हॉटेल व्यवसायिक आणि दुग्धजन्य पदार्थ वापरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आवश्यक असल्याचे दुग्ध व्यवसायाशी संबंधितांकडून सांगितले जात आहे.

२५ मे २०२६ पासून नवीन दर लागू होणार असून किरकोळ विक्रेत्यांनी त्यानुसार तयारी सुरू केली आहे.

 

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!