लोहारा, प्रतिनिधी : शहरातील कन्या प्राथमिक शाळेत २ व ३ एप्रिल रोजी आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत दोन दिवसीय ‘मंडल प्रशिक्षण वर्ग’ उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक कार्यपद्धती, वैचारिक अधिष्ठान आणि प्रभावी पक्षबांधणीचे महत्त्वपूर्ण धडे मिळाले.
या प्रशिक्षण वर्गात ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना रुजवण्यावर विशेष भर देण्यात आला. पक्षाची विचारधारा, कार्यविस्तार, बूथ व्यवस्थापन, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती, तसेच समाजकार्यातील भूमिका यावर विविध सत्रांमधून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच ‘सरळ अॅप’ व ‘नमो अॅप’च्या वापराबाबतही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

समारोप प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले, “पक्षाची विचारधारा गावागावात, वाडी-वस्तीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. कार्यकर्त्यांनी पदासाठी नव्हे, तर एकनिष्ठ शिलेदार म्हणून प्रामाणिकपणे काम करावे. संघटना एकसंध राहिली तरच तिचा विस्तार यशस्वी होतो.” त्यांनी कार्यकर्त्यांना गावपातळीवर जाऊन पक्षाचे जाळे अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.
यावेळी ‘वैचारिक अधिष्ठान’, ‘पक्षाचा इतिहास’, ‘कार्यविस्ताराची दृष्टी’ आणि ‘बूथ व्यवस्थापन’ या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात लोहारा तालुक्यात पक्ष अधिक जोमाने कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास भाजपा नेते अनिलजी काळे, विधानसभा प्रमुख राहुल पाटील, जिल्हा प्रभारी दत्ताभाऊ राजमाने, जिल्हा प्रशिक्षण प्रमुख साहेबराव घुगे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन घोडके, अस्मिताई कांबळे, रामदास कोळगे, शीतलताई पाटील, मंडल अध्यक्ष राजेंद्र पाटील, जि. चिटणीस शिवशंकर हतरगे, पं. स. सदस्य दत्ताभाऊ वाघमारे, नागनाथ पाटील, माजी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, हरी लोखंडे, प्रशांत काळे, महिला आघाडी अध्यक्षा आरती गिरी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच व मंडल कार्यकारिणीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!