धाराशिवराजकीय

मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना समितीवर सह-अध्यक्षपदी शरण बसवराज पाटील यांची निवड झाल्याने सत्कार

लोहारा / प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे युवा नेते श्री. शरण बसवराज पाटील यांची मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना समितीमध्ये उमरगा-लोहारा विधानसभा क्षेत्र सह-अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल लोहारा येथे त्यांचा आज यथोचित सत्कार करण्यात आला. या निवडीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात बाजार समिती सभापती प्रशांत काळे, संचालक दिपक मुळे, हरिभाऊ लोखंडे, बाबा सुर्यवंशी, संतोष फावडे, नगरसेवक राजू मुल्ला यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना शरण पाटील म्हणाले की, “पक्षाने व वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट राहील.”

ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील शेती रस्त्यांमुळे वाहतूक सुलभ होऊन उत्पादनाला बाजारपेठ मिळण्यास मदत होते. त्यामुळे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला जाईल.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीही पाटील यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यासाठी पाठिंबा दर्शविला. कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!