लोहारा : लोहारा तालुक्यातील भातागळी पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार सुयश दंडगुले यांना अधिकृतपणे नारळ 🥥 हे निवडणूक चिन्ह मिळाले असून, त्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. चिन्ह मिळताच समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
ग्रामभेटी, थेट जनसंवाद आणि विकासाचा ठोस आराखडा मांडत सुयश दंडगुले यांनी अल्पावधीतच मतदारांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. पक्षीय राजकारणाला कंटाळलेल्या मतदारांचा कल अपक्ष उमेदवाराकडे वाढताना दिसत असून, नारळ चिन्हामुळे त्यांची ओळख अधिक ठळक होणार आहे.
भातागळी गणात “नवा विचार, स्वच्छ प्रतिमा आणि जनतेसाठी काम” या मुद्द्यांवर सुयश दंडगुले यांची उमेदवारी लक्षवेधी ठरत आहे. येत्या निवडणुकीत ते कोणता प्रभाव पाडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.