धाराशिव : तालुक्यातील करजखेडा येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच शरद सुरवसे आणि ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब नागटिळे यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पक्षप्रमुख श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, आमदार श्री. कैलास पाटील, संपर्कप्रमुख श्री. सुनील काटमोरे आणि सहसंपर्कप्रमुख श्री. नंदूभैय्या राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश पार पडला.
यावेळी बोलताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला की, शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यांचे निराकरण केले जाईल तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून संघटना अधिक बळकट केली जाईल.
या प्रवेशप्रसंगी जिल्हा प्रवक्ते जगदीश पाटील, विभागप्रमुख मुकेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य फुलचंद बनकर, महेश कारभारी, नेताजी पाटील, महादेवनाना ढोले, चंद्रकांत ताकमोगे, सुभाष कळसुले, अरुण कोलगे, बालाजी सगट, दत्ता पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.