धाराशिव

सालेगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

लोहारा : तालुक्यातील सालेगाव येथील ब्रिगेडियर डॉ. शिवाजी भालेराव बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगत संविधानातील मूल्ये जपण्याचा संकल्प व्यक्त केला. देशाची एकता, अखंडता आणि लोकशाही मूल्ये टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील साळुंके, संस्थेच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष मनोज देशपांडे, सचिव संतोष भालेराव, व्याख्याते गोपाळ माने, ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर भालेराव, नितीन देशपांडे, बिराजदार सर, अण्णाराव देशपांडे, अण्णाराव भालेराव, गुलचंद मसलगे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करत राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!