धाराशिव

समता सैनिक दलाचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर कास्ती येथे उत्साहात संपन्न

लोहारा — भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा लोहारा अंतर्गत समता सैनिक दलाचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर मौजे कास्ती (ता. लोहारा) येथे दि. ११ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले.

शिबिराची सुरुवात पंचशील बुद्ध विहार येथे तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, त्रिसरण पंचशील घेऊन अभिवादनाने करण्यात आली.


प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष राजश्रीताई कदम, लेफ्टनंट कर्नल ॲड. अनिल कांबळे व कंपनी कमांडर उमेश सुरवसे यांच्या हस्ते समता सैनिक दलाचा ध्वज फडकावून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष दीपक सोनकांबळे होते.

या प्रशिक्षण शिबिरात लोहारा तालुक्यातील कास्ती, नागोर, भातागळी, आरणी, कलदेव लिंबाळा, अष्टा कासार आदी गावांतील ४९ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्व सैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातृसंस्थेत तन–मन–धनाने कार्य करण्याचा व त्यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला.


लेफ्टनंट कर्नल ॲड. अनिल कांबळे व कंपनी कमांडर उमेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्त, आदेशाचे पालन, नियमावली, समाज व संस्थेचे संरक्षण, तसेच समता सैनिक दलाचे महत्त्व याबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा व आंबेडकर चळवळीच्या संरक्षणासाठी सैनिकांनी सदैव सज्ज राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस विजय बनसोडे, जिल्हा महिला सचिव केराताई गायकवाड, जिल्हा संघटक ब्रह्मानंद गायकवाड, उमरगा तालुकाध्यक्ष उमेश सुरवसे, तालुका कोषाध्यक्ष अमित सुरवसे, संरक्षण उपाध्यक्ष आम्रपाली गोतसुर्वे, संरक्षण सचिव अंकुश भंडारे, महिला उपाध्यक्ष संगीता कांबळे, महिला संरक्षण सचिव सीता सोनवणे, तसेच जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी, सैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशिक्षणार्थी व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था संरक्षण उपाध्यक्ष आम्रपाली गोतसुर्वे व संरक्षण सचिव अंकुश भंडारे यांच्या वतीने करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्यमान सचिन भंडारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष दीपक सोनकांबळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!