लोहारा – लोहारा शहरातील जिजाऊ मेमोरियल प्रशासकीय सेवा महाविद्यालयात आज दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब व युवकांनचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने महामानवाच्या प्रतिमेचे पुजन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दिपक गोरे, प्रमुख पाहुणे श्री. डि. एम. कुर्ल ( ग्रामसेवक नागराळ ) श्रीकांत बिराजदार ( जेवळी ) उपप्राचार्य यशवंत चंदनशिवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना उपप्राचार्य यशवंत चंदनशिवे म्हणाले, ” राजमाता जिजाऊ आईसाहेब यांनी जे संस्कार बाल शिवाजी महाराजांनवर केले तेच संस्कार, संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी छञपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापणा करून रयतेला सुशासन निर्माण करुन दाखविले. अनेक वर्ष रयत अन्याय- अत्याचार सहन करत होती. त्यांनाचा नितप्त करण्याचे महान कार्य छञपती शिवाजी महाराजांनी केले त्यांची पूर्ण प्रेरणा हि राजमाता जिजाऊ आईसाहेब यांनची होती. एक महान सुसंस्कृत मातेमुळेच एक आदर्श सुपूञ जन्माला आला. हेच संस्कार आजच्या माता – भगिनीनी अंगीकारले पाहिजेत. तसेच स्वामी विवेकानंद हे आजच्या युवा शक्तीचे प्रेरणास्थान असले पाहिजेत. त्यांनी आपल्या आचरणातून आदर्श सुपूञ कसा असावा हे जगाला दाखवून दिले.ते अत्यंत कुशाग्र बुध्दीचे तर होते. त्यांनी अमेरिकेतील शिकागो धर्म परिषदेमध्ये जगाला विश्व बंधुत्वाची परिचिती आपल्या भाषणाच्या सुरुवातीला बंधु आणि भगिनींनो असा सुसंस्कारित वाक्यानी केली. त्यांनी हिंदू धर्म सर्व धर्माची जननी आहे हे वेद, पुराणातील उदाहरणे देवून पटवून सांगितले. अध्यात्मिक शक्तीची प्रचितीच जगाला विश्व शांतीकडे घेवून जाते हे निर्भीडपणे सांगितले. अशा महान आदर्श माता आणि आदर्श सुपूञ राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांनाचे विचारच भारताला विश्वगुरु बनवू शकतात.
यावेळी ग्रामसेवक डि. एम. कुर्ल यांनी ही मार्गदर्शन करताना राजामाता जिजाऊ आईसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा गौरव केला. तर अध्यक्षीय समारोपात दिपक गोरे म्हणाले, सिंधखेडराजा हि राजमाता जिजाऊ आईसाहेब यांचे जन्मस्थळ जगासमोर आणण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. या संघर्षात, चळवळीत मी सहभागी होतो याचा मला अभिमान वाटतो.
या कार्यक्रमाचे सुञसंचलन किरण चिचोले यांनी केले तर आभार आण्णासाहेब देवकर यांनी मांडले. यावेळी प्रा. प्रियांका जमादार, वैष्णवी लोहार, शितल मोरे,सत्यनारायण गोरे, बब्रुवान माटे, वैभव साठे, कृष्णा समदाळे, विलास बाबळे, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.