धाराशिवराजकीय

भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा संयोजकपदी मिथुन शिवाजी राठोड यांची निवड – पक्षवाढीसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार

लोहारा (जि. धाराशिव), दि. १० ऑक्टोबर –
भारतीय जनता पार्टीच्या भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा संयोजकपदी श्री. मिथुन शिवाजी राठोड यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड भाजप जिल्हाध्यक्ष मा. दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

श्री. राठोड यांच्या निवडीची बातमी समजताच जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. या प्रसंगी राठोड यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की,

“भटक्या-विमुक्त समाजाच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने लढा देत राहणार असून, पक्षाच्या धोरणांनुसार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत भाजपा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करू.”

याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी राठोड यांच्या निवडीमुळे भटक्या-विमुक्त समाजाला नवी दिशा आणि बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
श्री. राठोड हे तरुण, ऊर्जावान आणि कार्यतत्पर नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वामुळे आघाडीचे कार्य अधिक प्रभावीपणे होईल, अशी अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!