लोहारा ( जि. धाराशिव ) : शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या संकल्पनेतून कानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील १६ गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्याला उंडरगाव येथे शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या संवाद दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अनिल जगताप यांच्या पाठीमागे ताकतीने उभे राहण्याचे आवाहन केले.
HTML img Tag

डॉ. पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून अनिल जगताप यांनी धाराशिव जिल्ह्यात सातत्याने प्रयत्न केले आहेत. गावखेड्यातील शेतकऱ्यांना तांत्रिक बाबींची माहिती मिळावी, शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांनी एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी भावनिक साद त्यांनी घातली.
या संवाद दौऱ्यात सन २०२० ते २०२५ या कालावधीतील थकीत पीक विमा, अतिवृष्टी अनुदान, कांदा अनुदान, प्रोत्साहन अनुदान, दूध अनुदान तसेच इतर शासकीय येणे याबाबत शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत. भरलेले अर्ज जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करून संबंधित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.

अनिल जगताप यांनी २०२० ते २०२५ या कालावधीत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा व अतिवृष्टी अनुदान मिळवून देण्यासाठी शासन दरबारी, वेळप्रसंगी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय तसेच राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे दाद मागून न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे शेकडो कोटी रुपयांचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. मात्र, अद्याप काही शेतकरी मंजूर अनुदान असूनही त्यांच्या हक्काच्या रकमेपासून वंचित आहेत.

अशा शेतकऱ्यांसाठी सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्यातून अर्ज भरून घेऊन प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, वक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तुषार वाघमारे, लोहारा तालुका राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नरदेव कदम, उंडरगावच्या सरपंच सोनाली वाघमारे, उपसरपंच हिराचंद मोरे, ग्रामपंचायत सदस्य भुमेश पवार, विवेक सेवा सोसायटीचे चेअरमन युवराज तोडकरी, सदस्य पवन सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी रंगनाथ जाधव, प्रदीप ढोबळे, महेश घोडके, गणेश सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, विश्वास ढोबळे, बालाजी माने, ज्ञानेश्वर ढोबळे, अमित ढोबळे, संजय माने, वीट उत्पादक राजेंद्र सूर्यवंशी, श्रीशैल्य साखरे, शुभम साखरे, अण्णा जगणे, पंडित चव्हाण, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, बालाजी गाडे, सुभाष गाडे, सागर रवळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!