धाराशिवशैक्षणिक

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत लोहारा तालुक्याची छाप; अधिकारी–कर्मचाऱ्यांचे घवघवीत यश

लोहारा – धाराशिव येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय अधिकारी–कर्मचारी क्रीडा स्पर्धेत लोहारा तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दमदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. तुळजाभवानी स्टेडियम येथे पार पडलेल्या या स्पर्धांमध्ये विविध खेळप्रकारांत लोहारा तालुक्याच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवत बक्षिसांची लयलूट केली.

या स्पर्धांमध्ये जयश्री गोबाडे यांनी गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. मोहन अगंबरे यांनी चालणे स्पर्धेत द्वितीय, तर वंदना अकोसकर यांनी थाळीफेकमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. जयश्री गोबाडे यांनी भालाफेकमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. कॅरम एकेरीत गजानन सुतार यांनी तृतीय क्रमांक मिळवला. दुहेरी बॅडमिंटनमध्ये आसिफा सय्यद व सुप्रिया माळवदकर यांनी तृतीय क्रमांक मिळवून तालुक्याचा नावलौकिक वाढवला.

महिला ४०० मीटर धावणे स्पर्धेत डॉ. किरण माले यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. बॅडमिंटन एकेरीत प्रदीप जाधव यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. पुरुष कॅरम दुहेरीत गजानन सुतार व प्रविण शिंदे यांनी यश संपादन केले.
क्रीडास्पर्धांसोबतच सांस्कृतिक स्पर्धांमध्येही लोहारा तालुक्याने आपली कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली. वर्षा चौधरी यांनी ‘जलवा तेरा जलवा’ या गीतावर नृत्य सादर केले. केवळ कांबळे यांनी नृत्य व ‘बेटी बचाव’ एकांकिका सादर करून सामाजिक संदेश दिला. तसेच ‘उदे गं अंबे उदे’ व ‘ललाटी भंडार’ या गीतांवर अस्मिता सुरवसे, केवळ कांबळे, सुनिता लोकरे, विकास घोडके, गोविंद घारगे, सचिन पाटील, स्वराज पाटील व नागनाथ कुंभार यांनी सादर केलेल्या समूह नृत्याने प्रेक्षकांची दाद मिळवली.


या यशाबद्दल गटविकास अधिकारी जे. टी. वग्गे, कक्ष अधिकारी नागनाथ कुंभार, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, केंद्रप्रमुख विश्वजीत चंदनशिवे यांच्यासह महादेव जगताप, सुदर्शन जावळे, रसूल शेख, रफीक शेख, सुरेश साळुंके, दाजीबा साबळे, शंकर काळे, पंडित राठोड, नितीन कदम, प्रविण कदम, बाळू कदम, मोईज सौदागर, नयन शेख, नारायण घोडके, सुधीर घोडके, नाना कोळी, अनिल अर्जूने, प्रविण अगंबरे, सोमनाथ चिंनगुंडे, भीमाशंकर डोकडे, गजानन मक्तेदार, नेहा भंडारे यांच्यासह तालुक्यातील शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!