लोहारा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कानेगाव येथे दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पालक मेळावा, देणगीदारांचा व ग्रामस्थांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा सहभाग वाढविणे, तसेच शाळेच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या देणगीदारांचा व ग्रामस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ यांचे संस्कारमूल्य आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमास गावातील पालक, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी केले आहे.