लोहारा ( जि. धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील जेवळी जिल्हा परिषद महिलांसाठी खुला असलेल्या गटातून आष्टा कासार येथील सौ प्रीती प्रशांत आळंगे या भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक आहेत. त्यांनी जेवळी गटातील सर्व गावात एक प्रचार फेरीतुन दौरा सुद्धा पूर्ण केला आहे.
विठ्ठल साई सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक ॲड. आळंगे विरसंगप्पा शरणाप्पा यांच्या भावाच्या ह्या धर्मपत्नी आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे त्याची उमेदवारी जवळ जवळ फिक्स मानली जात आहे.असे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे.पक्षाच्या स्थानिक सर्व नेत्यांच्या आग्रहास खातर त्याची उमेदवारी जवळ जवळ भाजपा तर्फे निश्चित ही झाल्यां ची चर्चा आहे.
आळंगे परिवार हा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या विचारधाराशी पिढ्यान पिढ्या सतत कार्यरत असतात. आणि त्यांच्याच आशीर्वादाने ही उमेदवारी निश्चितच मानली जाते. अशी जोरदार चर्चा सर्व स्तरातून व मतदार संघातून चालू आहे. फक्त अधिकृत घोषणाच होण्याचे बाकी शिल्लक आहे. असे बोलले जात आहे.
सौ.प्रीती आळंगे यांचे पती प्रशांत आळंगे यांचा जेवळी गटातील व सर्व परिसरातील गावात, राजकीय वर्तुळात त्यांचे चांगले कार्य आहे. गोरगरीब जनता, शेतकरी, नवयुवक, वडीलधारी मंडळी, कर्मचारी व सर्व समाजातून त्यांना चांगला पाठिंबा मिळत आहे.
राजकीय वर्तुळात आळंगे कुटुंबाचे चांगले वर्चस्व आहे. त्यांचे कार्य व समाजसेवा यावरच त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हे बसवराज पाटील साहेब यांच्या सोबत सतत झटत असतात. स्थानिक पातळीवरील सर्व प्रश्नांवरची जान असलेले हे कुटुंब आहे. रस्ते, लाईट, पाणी, आरोग्य, शिक्षण, शेतकऱ्याचे प्रश्न अशा गोष्टीकडे सतत विकासात्मक दृष्टीने प्रयत्न करत असतात.
त्यामुळेच सर्व जनतेतून त्यांच्या नावाला एकमुखी पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या नावाची फक्त आता घोषणाच शिल्लक राहिली आहे. त्यांना जेवळी उत्तर, जेवळी दक्षिण, फनेपूर, रुद्रवाडी, भोसगा,दस्तापुर, पांढरी को. आष्टा कासार, अचलेर या सर्व गावातून त्यांना जाहीर पाठिंबा प्रत्येक स्तरातील लोक देत आहेत. सर्वत्र आळंगे यांच्याच उमेदवारीची चर्चा चालू आहे.