लोहारा ( जि. धाराशिव ) : उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण करणारे क्लासिक डेव्हलपर्स चे सर्वेसर्वा असलम भाई सय्यद यांना ईगल फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय उद्योजकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार सोहळा आष्टा येथे अत्यंत दिमाखात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्रामविकास मंत्री आमदार अण्णासाहेब डांगे, पद्मश्री दादा इदाते, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव चिमणभाऊ डांगे, दैनिक रोखठोक चे संपादक सुरेश वाडकर, ईगल फाउंडेशनचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर व प्रा. डॉ. महेश मोटे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजाभिमुख दृष्टीकोन, रोजगारनिर्मिती आणि विकासाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना उद्योगक्षेत्राकडे वळविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेऊन सय्यद यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकृतीनंतर असलम भाई सय्यद यांनी फाउंडेशनचे आभार मानत सांगितले की, “हा सन्मान माझ्या कार्याला नवी प्रेरणा देणारा आहे. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करत राहणे हीच खरी जबाबदारी आहे.”
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सय्यद यांच्या सामाजिक जाण, व्यावसायिक प्रामाणिकपणा आणि उद्योजकतेतील योगदानाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Back to top button
error: Content is protected !!