धाराशिवमहाराष्ट्र

लोहारा शहरातील गुरुवर्य कुमारसागर स्वामी महाराज यांना “राष्ट्रीय शिवकथाकार” पुरस्कार कपिलधार येथे शिवा संघटनेचा २०२५ चा सन्मान समारंभ संपन्न

लोहारा ( जि. धाराशिव )  : शिवा संघटनेतर्फे आयोजित “राष्ट्रीय शिवकथाकार पुरस्कार–२०२५” या प्रतिष्ठेच्या सन्मानाने लोहारा शहरातील गुरुवर्य कुमारसागर स्वामी महाराज लोहारेकर यांना गौरविण्यात आले.
हा पुरस्कार समारंभ कपिलधार येथे मोठ्या उत्साहात पार पडला. शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री बाबासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

 

HTML img Tag Simply Easy Learning

गुरुवर्य कुमारसागर स्वामी महाराज यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जनजागृतीचे कार्य केले आहे. त्यांच्या प्रभावी वाणी आणि शिवचरित्रातील सखोल अभ्यासामुळे समाजात ते “शिवकथाकार” म्हणून ओळखले जातात.

कार्यक्रमात विविध जिल्ह्यांतील शिवप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते व संतभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!